यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल वनक्षेत्रातील व इतर वनक्षेत्रातील विविध अधिकारी यांच्यासाठी तज्ञांच्या संकल्पनेतून आदिवासी व बिगर आदिवासी ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांसाठी मधुमक्षिका पालन व आदि रोजगाराच्या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत ५ दिवसीय प्रशिक्षण शिबीर यावल व चोपडा येथे घेण्यात आले. या कार्यक्रमात मधुमक्षिका पालनावर जिल्ह्यातील विविध अधिकारी आणि तज्ञांच्या संकल्पनेतून आयोजित ५ दिवसीय प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात मधु मक्षिका पालन (बी कीपिंग) या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक आदिवासी आणि बिगर आदिवासी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच लाख, मध, डिंक, बांबू व महुआ यांचे उत्पादन व्यवस्थापन आणि कौशल्य वाढविणे या उद्दिष्टातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, सहाय्यक व्यसंरक्षक चोपडा प्रथमेश वि.हाडपे, प्रमुख मार्गदर्शक म्हणुन: उमेद स्कील डेव्हलपमेंट फाउंडेशनचे विरेंद्र छाजेड आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुढील चार दिवसात लाख, डिंक, बांबू व महुआ यांचे उत्पादन व्यवस्थापनावर तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण आणि आदिवासी लोकांना स्वयंपूर्णता आणि आर्थिक स्थैर्याच्या दिशेने प्रेरित करणे आहे.सदस्यांची सहभागिता:स्थानिक आदिवासी आणि बिगर आदिवासी लोकांना उत्साहजनक प्रतिसाद मिळणार आहे. प्रतिभागींच्या प्रश्नांना सत्रांदरम्यान तज्ञांनी उत्तरे दिली. प्रशिक्षणाचा प्रभाव:या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना उत्पादन कौशल्यात वाढ होऊन स्वयंपूर्ण व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. विशेषतः मधु मक्षिका पालनाच्या माध्यमातून, ग्रामीण व आदिवासी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशी माहिती देण्यात आली.