आचार्य महाविद्यालयात हिजाबनंतर जीन्स व टी शर्टवर बंदी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतल्या चेंबूर या ठिकाणी असलेल्या आचार्य महाविद्यालयात सोमवारी जेव्हा विद्यार्थी गेले तेव्हा त्यांना एक प्रकारे धक्काच बसला. कारण अनेक मुलांना जीन्स आणि टी शर्ट घातल्याने अडवण्यात आले. या मुलांनी जेव्हा त्याचे कारण विचारलं तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की जीन्स-टी शर्टवर बंदी घालण्यात आली आहे. चेंबूर येथील एन.जी. महाविद्यालयाने घातलेली नकाबबंदी योग्य आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २६ जून रोजी दिला होता. त्यानंतर आता या महाविद्यालयात जीन्स आणि टी शर्ट दोहोंवर बंदी घालण्यात आली आहे.

ड्रेस कोडचा नियम २७ जून पासून लागू करण्यात आला आहे. ज्यानुसार फाटलेल्या जीन्स, टी शर्ट, अंग प्रदर्शन करणारे कपडे, जर्सी यांना मनाई करण्यात आली आहे. प्राचार्यांच्या सहीने असलेल्या या नोटीसमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात फॉर्मल पोशाख घालावा. हाफ शर्ट, फुल शर्ट आणि पँट घालण्यास मनाई नाही. मुली कोणताही भारतीय पोशाख वापरु शकतात. ज्या पोशाखातून धर्म दर्शवणारा एकही पोशाख कुणीही परिधान करु नये. मुलींनी जर अशा प्रकारचे बुरखा, नकाब, टोपी, स्टोल असं काहीही परिधान केलं असेल तर ते कॉमन रुममध्ये जाऊन काढून टाकण्यात येईल असंही या नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

Protected Content