यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळन्हावी आणि जळगाव शिवारातील तापी नदीच्या पात्रातुन मोठया प्रमाणात वाळु माफीयांकडुन वाळुचा उपसा करून बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असल्याने आज (दि३०) महसुल आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करण्यात आली मात्र वाळु माफीया वाहने घेवुन आधीच पसार झाल्याने ही मोहीम अयशस्वी ठरली.
तापी नदीच्या पात्रातुन मोठया प्रमाणात वाळुचा बेकाद्याशीर उपसा करून चोरटया मार्गाने वाहतुक करण्यात येत असल्याचीची गुप्त माहिती महसुल प्रशासनाला मिळाल्याने, आज सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुंवर, जितेन्द्र पंजे, तलाठी व्ही.व्ही. नागरे, तलाठी एस.व्ही. सुर्यवंशी व महसुलचे अन्य कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्या संयुक्त पथकाने अचानक कोळन्हावी शिवारातील तापी नदीच्या पात्रात जावुन तपासणी केली असता, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे पथक येण्याआधीच वाळुची बेकाद्याशीर वाहतुक करणाऱ्यांनी आपली (ट्रॅक्टर) वाहने घेवुन पळ काढला होता. सदरचे पथक हे कार्यवाहीस येत असल्याची गुप्त माहिती ही उघड झाल्यानेच वाळु चोरटे हे पळुन जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती महसुल प्रशासनाने दिली आहे. आज झालेल्या या कारवाईत जरी महसुल प्रशासनाच्या हाती काही लागले नसले तरी त्यामुळे वाळु माफीयांचे धाबे दणाणले आहे.