साकेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे ऐन शेतीच्या कामाच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शिवाय जळगाव एमआयडीसीतून कमी पाण्याच्या दाबामुळे आणि पाईपालाईन फुटल्याने या गावात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान दोन दिवसात साकेगावात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी एमआयडीसीकडे पाणी पुरवठ्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगावात गेल्या अनेक दिवसांपासून एमआयडीसीतून कमी दाबामुळे पाणीपुरवठा होत असल्याने गावातील ग्रामस्थांना मोठा सामना करावा लागत आहे. शिवाय या गावातील काही ठिकाणी पाईपलाईन देखील फुटल्याने त्यांचे दुरूस्तीचे काम देखील हाती घेत आहे. सध्या शेतीची काम जोरात सुरू आहे. त्यातच साकेगावात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. उच्च दाबातून गावात पाणीपुरवठा करण्याबाबत एमआयडीसीशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.