भाजीपाला विक्रेत्याचा प्रामाणिकपणा : सापडलेली सोन्याची मंगलपोत महिलेला केली परत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील नायगाव येथील एका विवाहितेची ५० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगलपोत हरवली होती. ही मंगलपोत गावातील एका भाजीपाला विक्री करणाऱ्या तरूणास सापडली. तरूणाने प्रामाणिकपणा दाखवून सापडलेली सोन्याची मंगलपोत ही महिलेला परत केल्याचे त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

यावल तालुक्यातील नायगाव या गावात राहणाऱ्या चारूशिला पाटील या गावात किराणा व भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हरवली होती. संपुर्ण कुटुंबाने या सोन्याचे पदक असलेल्या मंगळसुत्राचा सर्वत्र शोध घेतला पण मिळून आली नाही. दरम्यान गावातील सुनिल दौलत पाटील हा भाजीपाला विक्री करणारा अल्पभूधारक शेतकरी या तरूणास रस्त्यावर ही मिळुन आली. तेव्हा ही पोत कोणाची असावी असा तपास तरूणाने घेतला. गावातील पाटीलवाड्यात महिलेची पोत हरवल्याचे त्यास कळाले व त्याने संबधीत विवाहितेच्या घरी जावुन प्रामाणिकपणे पोत परत केली.

तेव्हा भाजीपाला विकुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरूणाच्या या प्रामाणीकपणा चे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान सदरच्या तरूणास कदाचित ही पोत नकली असावी म्हणुन कोणी तरी फेकून दिली असावी असा अंदाज त्यांनी लावला मात्र, त्यातील सोन्याचे पदक हे खरे असल्याचे त्यांना समजले तेव्हा त्यांनी स्वत:हा गावात तपास करायला सुरवात केली आणि पाटीलवाड्यात ते पोहचले, तेव्हा तेथे चारुशीला पाटील व त्यांचे कुटुंबीय पोत शोधत असल्याचे पाहुन त्यांची स्वत:हुन प्रामाणीकपणे सदरील पोत आपणास सापडली आहे, असे सांगत महिलेला पोत परत केली.

गावाचे पोलीस पाटील मनोज देशमुख, नारायण चौधरी, सुनील पाटील, धोंडू कुंभार, आदित्य पाटील, विशाल पाटील, सागर बोदवडे, विकास सावळे, आदिवासी समाज तरूण सामाजीक कार्यकर्ते सचिन तडवी , चंद्रशेखर पाटील, राहुल पाटील, दिवाकर धनगर, असिफ तडवी यांच्या समक्ष पोत महिलेस देण्यात आली.

Protected Content