Home क्राईम अश्लिल शिवीगाळ करत लोखंडी पट्टीने मारहाण केल्याने तरूण जखमी

अश्लिल शिवीगाळ करत लोखंडी पट्टीने मारहाण केल्याने तरूण जखमी


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाल्मीक नगरात राहणाऱ्या एका तरुणाला अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की करून लोखंडीपट्टीने वार करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी २४ जून रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी २५ मे रोजी पहाटे ३ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, राहुल गोकुळ कोळी (वय-२८), रा. आसोदा रोड, वाल्मीक नगर, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून फुले मार्केट परिसरात घड्याळ विक्रीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. दरम्यान सोमवारीच २४ जून रोजी रात्री ११ वाजता तो त्याच्या घरी असताना गावात राहणारा गोलू दिलीप सोनवणे (वय-२०) रा. वाल्मिक नगर, जळगाव याने त्याला अश्लिल शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर लोखंडी पट्टीने वार करून दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना घडल्यानंतर राहुल कोळी याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी राहुलने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोलू सोनवणे याच्या विरोधात मंगळवारी २५ जून रोजी पहाटे ३ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीराम बोरसे करीत आहे.


Protected Content

Play sound