बंद घरात फ्रीजने घेतला पेट घेतल्याने कपडे व इतर साहित्य जळून खाक

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिल्हापेठ येथील एका घरात बंद घरात फ्रीजने पेट घेतल्याने फ्रीजसह घरातील कपडे व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी २४ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन विभागाच्या बंबाने ही आग विझविण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हापेठ परिसरात प्रभाकर नाना पाटील यांचे घर आहे. सोमवारी २४ जून रोजी पाटील हे घर बंद करून बाहेर गेलेले होते. त्या वेळी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरातून धूर येत असल्याचे शेजारील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी इतर रहिवाशांनाही माहिती देत अग्नीशमन विभागाला कळविले. त्या वेळी अग्नीशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. घरी कोणीही नसल्याने दरवाजा तोडून पाण्याचा मारा करण्यात आला व ही आग विझवण्यात आली. फ्रीजने पेट घेतल्याने ही आग लागल्याचे दरवाजा तोडल्यानंतर लक्षात आले. त्यात फ्रीज जळून खाक होण्यासह घरातील कपडे, वायरिंग व इतर साहित्यही जळाले. आग विझवल्यानंतरदेखील अर्धा ते पाऊण तास घरातून धूर निघत होता. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content