यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील सातोद या गावात राहुरी कृषी विद्यापीठ आणि डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या वतीने कृषीकार्यनुभव कार्यक्रमांतर्गत हे विद्यार्थी कृषी विषयाच्या अभ्यासासाठी दाखल झाले. यावेळी सातोद ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
कृषीदुत प्रेम चौधरी, योगेश चौधरी, सुयोग चौधरी, अभीजीत चोपडे, अनिल ढाले, सुमीत ढोरे आणी विजयसिंग चव्हाण हे सातोद गावात चार महीने थांबुन शेती पद्धती पिक प्रात्यक्षीकांची माहीती घेतली. शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटीचे कामकाज कशा पध्दतीने चालते. शेतकऱ्यांना होणारे कर्जवाटप आणी वसुली व अन्य कामकाजाची माहीती घेतील. यावेळी कृषीदुत प्रक्षिक्षणार्थ विद्यार्थी यांचे सातोद ग्रामपंचायतच्या सरपंच लीना पाटील, उपसरपंच अनिल महाजन, ग्रामसेवक उल्हास पाटील यांनी कृषीदुतांचे स्वागत केले.