Home क्राईम कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण करत छळ

कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण करत छळ


जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जोशीपेठ येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी चांदवड येथे कौटुंबिक वादातून शिवीगाळ करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जळगाव शहरातील जोशीपेठ येथील माहेर असलेल्या गायत्री वैभव बागुल वय ३३ यांचा विवाह नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावातील वैभव विजयकुमार बागुल यांच्याशी झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला कौटुंबिक वादातून नेहमी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, जेठ, जेठाणी यांनी देखील त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी बुधवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती वैभव विजयकुमार बागुल, सासू माधुरी विजयकुमार बागुल, जेठ विशाल विजयकुमार बागुल, जेठाणी उमा विशाल बागुल सर्व रा. चांदसर जि.नाशिक यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ प्रतिभा पाटील ह्या करीत आहे.


Protected Content

Play sound