अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील पिंपळी जळोद गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे घटना १२ जून रोजी सकाळी ७ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील पिंपळी जळोद येथे आकाश गोरख थोरात वय १७ हा मुलगा वास्तव्याला आहे. १२ जून रोजी सकाळी ७ वाजता तो कामाला जात असल्याचे सांगून गेला होता. दरम्यान तो घरी परतला नाही, त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर त्याच्या आईने अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. यात अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी सोमवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहे.




