Home Cities अमळनेर दीड लाखांसाठी विवाहितेला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी

दीड लाखांसाठी विवाहितेला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रोफेसर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी दोंडाईचा येथे घर गहाण ठेवण्यासाठी माहेराहून दीड लाख रूपये आणावे अशी मागणी करत शिवीगाळ व मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार १३ जून रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील प्रोफेसर कॉलनीतील माहेर असलेल्या शमीनाबी रहिम खाटी वय ३६ यांचा विवाह दोंडाईचा येथील रहिम समसुद्दीन खाटीक यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला घर गहाण ठेवण्यासाठी माहेराहून दीड लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही या रागातून पती रहिम खाटीक याने शिवीगाळ करत विवाहितेला मारहाण केली. तसेच सासू, दीर, चुलत सासू, चुलत दिर यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ कर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी गुरूवारी १३ जून रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती रहीम समसुद्दीन खाटीक, सासू ताहेराबी समसुद्दीन खाटीक, दीर अलीम समसुद्दीन खाटीक, चुलत सासू नजमाबी सलीम खाटील आणि चुलत दीर जावेद सलीम खाटीक सर्व रा. दोंडाईचा यांच्या विरोधात अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हितेश चिंचोरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound