जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील स्पीड ब्रेकरवर दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅकने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी १० जून रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, संदीप दिगंबर चव्हाण वय-४०, रा. शिवम नगर जळगाव हा तरुण कामाच्या निमित्ताने मंगळवारी १० जून रोजी सकाळी १० वाजता त्याची दुचाकी एमएच १९ बीबी ६७४९) ने शिव कॉलनी येथून जात असताना स्पीड ब्रेकर जवळ मागून ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ७५११) ने मागून धडक दिली. या धडकेत संदीप चव्हाण हे जखमी झाले. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता संदीप चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक वरील अज्ञात चालकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.