यावल येथे शिवराज्यभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एक दिवस महाराजांसाठी या प्रतिष्ठानच्या व सकल हिंदू समाज यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

६ जून २०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील यावल शहरातील प्रसिद्ध राजे निंबाळकर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमात श्याम शास्त्री महाराज यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला राज्याभिषेक पूजन करून सोहळा सुरू झाला. पुजनासाठी अथर्व बयानी महाराज यांनी सहकार्य केले. त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्यापासून गावामध्ये शोभायात्रा सुरू झाली.

शोभायात्रामध्ये चुंचाळे येथील गुरुमाऊली भजनी व म्युझिकल बँड सोबत वडोदा येथील महिलांचे व पुरुषांचे भजनी मंडळ त्यानंतर शिवरायांची पालखी, शिवरायांचा सजीव देखावा, बुरझड जि-धुळे येथील सरस्वती बँड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे या शोभायात्रेमधील विशेष आकर्षण ठरले.

पुणे येथील प्रवीण चौधरी यांनी शिवरायांची भूमिका साकारली. कार्यक्रमाची सांगता बोरवली गेट येथील शिवतीर्थला झाली. शिवतीर्थ येथे सर्वात आधी “शिवरायांचा प्रताप” हे नाटक साजरा करण्यात आले. या नाटकासाठी धनराज कोळी, खेमराज करांडे, कुणाल चित्ते, ललित बारी, स्वामी चौधरी यांनी सादरीकरण केले. त्यानंतर शिवतीर्थावर शिव वंदना व ध्येयमंत्र घेऊन यावल शहराचे माजी नगरसेवक व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्याहस्ते शिव आरती करण्यात आली. पुणे येथील शिवभक्त समाधान लाड यांनी शिवगारद घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ अभय गणेश रावते, उपाध्यक्ष योगेश वारूळकर, धीरज भोळे, प्राची पाठक, धनंजय बारी, सागर चौधरी, मनसे शहराध्यक्ष अजय तायडे, पंकज जोहरी, दीपक वारूळकर, निलेश बारी, सोहम बारी, गोपी बारी, संदीप रेघे, गोलू बारी, सागर लोहार, चेतन बारी, गौरव बारी, ज्ञानेश्वर जाधव, मयूर बारी यांनी परिश्रम घेतले. असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहातच्या वातावरणात शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळाले.

Protected Content