पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथे कै. कृषी पंडित मोहनलाल लोढा यांचे यांचे बारावे पुण्यस्मरण व महा सती शौर्याची महासा दीक्षा दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पहूर येथे आयोजित रक्तदान शिबिराचे प्रसंगी सर्वप्रथम स्वर्गीय कैलासवासी कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले अध्यक्षस्थानी माननीय श्री जे के चव्हाण साहेब माननीय कार्यकारी अभियंता हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साधनाताई गिरीश महाजन नगराध्यक्ष जामनेर हे होते.
यावेळी उत्तम थोरात, माजी जि.प कृषी सहभागी प्रदीप लोढा, प्रल्हाद वानखेडे, प्रताप परदेशी, हेमंत दादा जोशी, माजी जि.प सदस्य राजधर पांढरे, राजमल भागवत, माजी जि.प सदस्य कैलास पाटील, दलित मित्र मोरसिंग काका नाईक, गोविंदा अग्रवाल, शैलेश पाटील, जे के चव्हाण, यांच्या सह मान्यवरांनी कैलासवासी कृषी पंडित मोहन लाल लोढा यांच्या जीवनपटावरील कार्याचा गौरव केला. जि. प. सदस्य प्रमिलाताई राघू पाटील, लोकनियुक्त सरपंच अबू तडवी, बाबुराव गोविंदा पांढरे चेअरमन कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्था, प्रफुल मोहनलाल लोढा, दीपक लोढा, श्याम सावळे माजी उपसरपंच पहूर पेठ, रामेश्वर पाटील अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती, तेजराज लुंकड, प्रकाश लोढा, विवेक जाधव, साहेबराव देशमुख, राजू पाटील, ललित लोढा, समाधान पाटील, राजू किसन पाटील, ईश्वर बारी, सचिन पाटील यांच्यासह असंख्य ग्रामस्थ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी जि. प. सदस्य कैलास पाटील यांनी केले.