यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपूडा पर्वता च्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यात अनेक गांव वस्ती व पाडयांवर आदिवासी बांधव राहतात. मागील आठवड्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली यावल तालुक्यातील एका आदिवासी वस्तीमध्ये थोरपाणी या वस्तीवरील येथे नानसिंग पावरा यांचे मातीचे घर असलेले घर वादळात कोसळुन जमीन दोस्त झाले व या दुदैवी घटनेत एकाच परिवारातील चार लोक ढिगाऱ्याखाली दाबले जावुन गुदमरून या चौघांचा मृत्यु झाला. या आंबापाणी गावाजवळ असलेल्या थोरपाणी या पाडयावर १५० कुटुंबाची वस्ती आहे.असे असतांना या ठीकाणी एकाही आदिवासी बांधवास अद्यापपर्यंत शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेले नाही.
यावल तालुक्यातील आदिवासींना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ द्या; मनसेची मागणी
7 months ago
No Comments