Home Cities चोपडा धानोरा येथे तब्बल 10 तास वीज पुरवठा बंद

धानोरा येथे तब्बल 10 तास वीज पुरवठा बंद

mahavitaran 1
mahavitaran 1

mahavitaran 1
 

धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) धानोऱ्यासह परिसरात गुरुवारी सायंकाळी पावसावसाने जोरदार हजेरी लावली. पंरतू या पावसामुळे गावातील लाईट तब्बल १० तास गायब होती. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

 

या संदर्भात अधिक असे की, येथिल वीज पुरवठा पाऊस सुरु होण्याच्या अर्धातासापूर्वीच बंद केला होता. पंरतू पाऊस हा मात्र 2 तासातच पुर्णपणे बंद झालेला होता. मग लाईट इतका वेळ बंद का? असा प्रश्न विचारण्यासाठी नागरिक धानोरा महावितरणच्या कार्यालयात फोन करत होते. परंतू तेथील सर्वच फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. अगदी थोड्याच पावसात महावितारचे पितळ उघडे पडलेले आहे.


Protected Content

Play sound