अमळनेर प्रतिनिधी । येथील लायन्स क्लबला उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी ५ स्टार रँकिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. संजय वोरा यांच्या हस्ते वाशीम येथे झालेल्या कार्यक्रमात क्लबचे अध्यक्ष प्रशांत सिंघवी, सेक्रेटरी डॉ. संदीप जोशी, ट्रेझरर विनोद अग्रवाल यांना हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संदीप जोशी, डॉ मंजिरी कुळकर्णी, झोन चेअरमन महावीर पहाडे, प्रदीप जैन, पंकज मुंदडा, योगेश मुंदडा, कुमारपाल कोठारी यांना गौरवण्यात आले आहे. क्लबच्या या यशाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.