अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला जिल्ह्यातील दाळंबी शेतशिवारात ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २९ मे रोजी मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून रात्री उशिरा बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतताना ही वृद्ध महिला दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर उतरली. घरी सोडतो असे सांगत 30 ते 35 वयोगटातील तीन अज्ञात तरूणांनी हे कृत्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, अकोला बस स्थानकावरून 78 वर्षीय वृद्ध महिला ही काल दुपारी एसटी-बसनं दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती. ती दाळंबी गावातच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला पोचली आणि तिथे उतरली. येथून गावाकडे पायी जात असताना तिथे तीन जण मोटरसायकलने आले आणि गावात सोडून देतो, असे सांगत तिला रस्त्यालगत असलेल्या एका लिंबाच्या शेतात घेऊन गेले. तिघांपैकी तीस ते पस्तीस वर्षाच्या एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली.
या दरम्यान गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले. तिने आरडाओरड सुरू केली. आवाज कानावर पडतातच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. हे पाहताच अत्याचार करणाऱ्या तिघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. गावातील दोन्ही व्यक्ती म्हातारी जवळ पोहचताच त्यांनी सुखरूपपणे तिला घरी सोडले. म्हातारीने आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर लागलीच कुटुंबीयांनी बोरगावमंजू पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली. गुन्हा नोंदवून तिन्ही अज्ञात आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.