जितेंद्र आव्हाडकडून महाडच्या चवदार तळयावर मनूस्मृतीचे दहन

महाड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, एससीईआरटीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेत आज २८ मे रोजी महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं.

मनुस्मृतीचं दहन करण्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला. आव्हाड म्हणाले, हे सरकार आज केवळ दोन श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा विचार करतंय. मात्र हळूहळू संपूर्ण मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण आत्ताच सावथ असलं पाहिजे. आव्हाड यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली. अजित पवार स्वतःला पुरोगामी विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणवतात, मग त्यांनी आता राज्य सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे का?”असा प्रश्न आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.

Protected Content