धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते भादली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकारणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. इर्शाद मेहबूब वय 30 रा. बाबुली जि. पानिपत राज्य हरियाणा असे मयत झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते भादली अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक 424 च्या 14 आणि 15 दरम्यान एका धावत्या रेल्वेतून परप्रांतीय तरुण इर्शाद मेहबूब हा खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी जळगाव तालुका पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे व पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content