टेंट हाऊस गोडावूनमधून एकाचा मोबाईलची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विसनजी नगरातील हरीओम टेंट हाऊस गोडावून मधून एकाचा ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना सोमवारी २० मे रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील विसनजी नगरातील हरीओम टेंट हाऊ गोडावून येथे आकाश भागवान माळी रा. पिंप्राळा, जळगाव हा तरूण कामाला आहे. सोमवारी २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रितेश पालवे रा. हरदा राज्य मध्यप्रदेश याने आकाश माळी याचा ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले. त्यानंतर गोडावूनचे मालक रोहित दाणेज यांनी जिल्हापेठ पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार मोबाईलची चोरी करणारा रितेश पालवे याच्या विरोधात मंगळवारी २१ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप पाटील हे करीत आहे.

 

Protected Content