यावल तालुक्यात गुटख्याची चोरटी वाहतूक; कारवाईची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यात पोलीसांनी तीन ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत लाखो रूपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. असे असतांना अजूनही यावल तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर गुटख्याची चोरटी वाहतूक होत असून तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा दाखल होत आहे. यात दोन्ही राज्यातील दररोज लाखो रूपयांचा गुटखा विक्री केला जातो. दरम्या गुटखा विक्री करण्यापुर्वी लाखो रूपयांचा गुटखा गोदामात साठवून ठेवला जात आहे. यावल तालुक्यात दर महिन्याला ५० ते ६० लाखांचा तंबाखू, गुटखा आणि कुस्करलेली सुपारी विक्री होत आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने याची तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरीकांकडून जोर धरली जात आहे.

Protected Content