Home राजकीय मावळमध्ये दादा गटाने माझा १०० टक्के प्रचार केला नाही – श्रीरंग बारणे

मावळमध्ये दादा गटाने माझा १०० टक्के प्रचार केला नाही – श्रीरंग बारणे


पिंपरी चिंचवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मावळ मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहे. मावळ लोकसभेत महायुतीत खदखद होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा १०० टक्के प्रचार केला नाही, अशी कबुली महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दिली. मात्र, तरीही मावळमध्ये माझा 2 लाख 50 हजार 374 मतांनी विजय होईल, असा दावा श्रीरंग बारणे यांनी केला. त्याचवेळी माझा प्रचार न करणाऱ्यांची नावे मी अजित पवार यांच्याकडे दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

अजित पवार गटाने माझा शंभर टक्के प्रचार केला असता तर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे डिपॉझिट जप्त झाले असते, असा दावा श्रीरंग बारणेंनी केला.
अजित पवार यांनी मावळमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. अजितदादा गटाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केले. पण काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. याची लिस्ट मी अजित पवारांकडे दिली आहे असेही बारणे यांनी म्हटले.


Protected Content

Play sound