Home क्राईम भुसावळात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

भुसावळात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात अंदाजे ६० वर्षीय अनोळखी वृध्दाचा मृतदेह सोमवारी २० मे रोजी सकाळी ८ वाजता आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरात सोमवारी २० मे रोजी सकाळी ८ वाजता अंदाजे ६० वर्षीय अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे रवाना केला. मयताची अद्याप कोणतीही ओळख पटलेली नाही. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र भावसार हे करीत आहे.


Protected Content

Play sound