अकोल्यातील मोर्णा नदी पात्रात आढळून आला एका चिमुकल्याचा मृतदेह

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील मोर्णा नदीत एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. हा चिमुकला अवघ्या एक वर्षांचा असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून तो अकोल्याती वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

अद्याप त्याची ओळख पटली नसून पोलिस तपास करत आहे. या चिमुकल्याचा मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून नदीच्या पाण्यात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र चिमुकल्याच्या मृत्युबद्दल घातपाताची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक कृतीची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content