सोलापुर जिल्हयात दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून दोन जणांची हत्या

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोलापूर जिल्हयात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून दोन जणांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी सहावाजेच्या सुमारास घडली आहे. किरकोळा कारणावरून हाणामारीत रूपांतर झालेल्या या वादात धारदार हत्याराने दोन जणांचा खून करण्यात आला आहे. यातील मारेकरी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी नातेपुते येथील एका बिअर बार परमिट रुममध्ये आरोपी अक्षय बोडरे व त्याचा दाजी, या दोघांनी नारायण विठ्ठल जाधव यास किरकोळ गोष्टीवरून शिवीगाळ करुन मारहाण केली. बारमध्ये घडलेल्या या घटनेचा जाब विचारण्यास फिर्यादीसह नारायण विठ्ठल जाधव, दुर्योधन नवनाथ निकम, बाळू कुंडलिक जाधव, विनोद पोपट गोरे हे सायंकाळी नातेपुते ते फोंडशिरस जाणाऱ्या रोडवरील बनात असलेल्या महादेव मंदिराजवळ गेले होते. याठिकाणी आरोपी अक्षय बोडरे, त्याचा दाजी व काही अनोळखी मुलांना एकत्र बोलावून अक्षय बोडरे खोटी माहिती दिली. आम्हालाच या सर्वांनी मारहाण केल्याचं अक्षयने सांगितले होते. त्यामुळे, अक्षय व त्याच्यासोबतच्या अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळी धमकी दमदाटी करून विटा मारुन जखमी केले.

अनोळखी मुलांपैकी एकाने अक्षय बोडरे यास चाकूसारखे धारदार हत्यार दिले. त्यानंतर त्या हत्यारानेच अक्षय बोडरेने नारायण विठ्ठल जाधव व दुर्योधन नवनाथ निकम यांच्या पोटात तीक्ष्ण हत्यार काढून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खूपसले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मृत दोघांचेही पार्थिव नातेपुते येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटननास्थळी भेटी देऊन फरार आरोपीच्या शोधकामी एकूण तीन पोलीस पथके तयार केली आहेत.

Protected Content