धुळे, पालघर, डोंबिवली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बिघडले

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. १३ मतदारसंघात आज मतदान होत आहे. धुळे मतदारसंघातही आज मतदान होत आहे. मात्र येथील एका मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाचरांगा लागल्या आहेत.

हा प्रकार एन.एम.सरदार हायस्कूलमधील मतदान केंद्रावर घडला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने मशीन दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहेत. याप्रमाणे पालघर व डोंबिवली येथे ही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे.

Protected Content