धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव ग्रामीण रुग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी.एम. यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, धरणगाव शहरातील लोकसंख्या 50 हजारपर्यंत असुन तालुक्याला लागून 65 खेडी आहेत. धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची स्थापना स्वातंत्र्यापूर्वीची असून या ठिकाणी कर्मचारी संख्या कमी आहे. धरणगाव तालुक्याची परिस्थिती पाहता मंत्री धरणगाव तालुक्यातील, जिल्हा प्रमुख, उपप्रमुख धरणगावचे न.पा. मध्ये 20 नगरसेवक सेना-भाजपाचे केंद्रात व राज्याचे युतीचे शासन हे सर्व असून ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी अद्याप भरला गेला नाही. निवासी डॉक्टर या ठिकाणी राहायला तयार नाही. नागरीकांसह रूग्णांच्या समस्या जाणून किमान 2 निवासी डॉक्टर तात्काळ नियुक्त करण्याची मागणी उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केली आहे.