मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगरातील एका प्रतिष्ठित शाळेतील पालक व संचालक यांच्या तणावावरून दोघांनी परस्पराविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहे. संचालकांवर पालकांने ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तर संचालकांने त्यापालकांविरूध्द हत्येची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चिरंजीलाल टावरी हे शहरातील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संचालक आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून असे की, २० फेब्रुवारी रोजी त्यांच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गॅदरीगचा कार्यक्रम होता. स्टेजच्या मागे असलेल्या रूममध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी हे कार्यक्रमाकरिता लागणारे ड्रेस ठेवून तेथे गॅदरिंग करिता लागणारे ड्रेस बदलवित असताना महेंद्र प्रल्हाद उमाळे हा वारंवार स्टेजच्या मागे येत होता. तेव्हा संतोष टावरी यांनी महेंद्र उमाळे याला रोखले असता तो दारूच्या नशेत होता. त्यांने संतोष टावरी यांना शिवीगाळ केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात संतोष टावरी यांनी महेंद उमाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
महेंद्र उमाळे यांने संतोष टावरी आणि बाळू राणे यांच्या विरोधात ॲट्रासिटीवरून तक्रार केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून उमाळे यांचा मुलगा संतोष टावरी यांच्या शाळेत शिक्षण घेत असून शाळेत गॅदरीगचा कार्यक्रम ४ वाजता सुरू होणार होता पण तो ७ वाजता सुरू झाला आणि रात्री १२ वाजता संपला त्यावेळी महेंद्र उमाळे यांनी शाळेच्या मुख्यध्यापकांनी सांगितले की, एवढा वेळ पालक खाली बसू शकत नाही तुम्ही पालकांकडून फी घेतात तर पाणी आणि खुर्चीचे नियोजन का केले नाही. याचा राग आल्यावरून संतोष टावरी यांनी जातीवाचक शब्द बोलून महेंद्र उमाळे यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्याविरोधात उमाळे यांनी संतोष टावरी आणि बाळू राणे यांच्याविरोधात ॲट्रासिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवला आहे.