बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा रद्द झाली आहे. सभा पुढे ढकल्यामुळे आता 4 जून पूर्वी उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत. त्यांची भेट त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
येत्या 8 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमधील नारायणगड येथे सभा होणार होती. त्यासाठी 400 एकर मैदानावर तयारी सुरु होती. सभेला लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार होते. राज्य सरकारला धडकी भरवणारी ही सभा असेल, असा दावा आंदोलकांकडून करण्यात येत होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. नारायण गडावरील सभेवर दुष्काळाचे सावट होते. त्या परिरात भीषण दुष्काळ पाहता सभा रद्द करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आता मराठा समाजाच्या पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची ८ जुनची सभा रद्द
6 months ago
No Comments