अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावती येथील जयस्तंभ चौकात एका खाजगी बँकेत ५०० रुपयांच्या ८ बनावट नोटा आढळल्या आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ मे रोजी मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला आहे. बँक कर्मचारी श्रीकांत काळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ते मुळचे चांदूर बाजार येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार मंगळवार, १४ मे रोजी दुपारी एक ग्राहक ५ लाखांची रक्कम डिपॉझिट करण्यासाठी बँकेत गेला. त्याने सदर रक्कम ही श्रीकांत काळे यांना दिली. त्या रकमेमध्ये पाचशे रुपयांच्या ८०० नोटा होत्या.
श्रीकांत काळे हे ती रक्कम मोजत असतानाच त्यांना त्यातील ८ नोटा बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे श्रीकांत काळे यांनी त्या नोटांची पुन्हा पडताळणी केली. मात्र, त्यातही त्या बनावटच असल्याचे आढळून आले. त्यानंतर काळे यांनी याबाबत आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन सायंकाळी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. बँकेचे ग्राहक रश्मी ट्रेडर्स यांना कुणीतरी अज्ञात ग्राहकाने ५०० रुपयांच्या या ८ बनावट नोटा दिल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती येथे एका खाजगी बँकेत आढळल्या ८ बनावट नोटा
8 months ago
No Comments