‘या’ उमेदवारांना स्वत:ला मतदान करता आले नाही

पुणे-लाईव्ह ट्रेंड न्युज वृत्तसेवा | राज्यात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी आज मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. या टप्प्यातील मतदानात अनेक दिग्गज निवडणूकीच्या रिंगणात आहे. परंतू तीन उमेदवार असे आहे की त्यांना स्वत:ला मतदान करता आले नाही. कारण त्यांचे त्या मतदार यादीत नाव नाही आहे. अहमदनगमधून सुजय विखे पाटील हे भाजपकडून उमेदवार आहे. त्यांचे नाव शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोणीच्या मतदारयादीत नाव आहे.
शिवसेनो शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगराचे उमेदवार संदीपन भूमरे यांचे नाव जालन्यामधील पैठणमधल्या यादीत असल्याने ते स्वत:ला मतदान करू शकत नाही. तिसरे नाव वंचित बहूजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत मोरे आहे. त्याचे नाव शिरूर मतदारसंघातील कात्रजमध्ये असल्याने त्यांनीही पुण्यात मतदान न करता कात्रजमध्ये मतदान केले.

Protected Content