Home क्राईम अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण गंभीर जखमी


accident5 201905244186
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुर भागातील राहणारा एक तरुण चोपडा येथे जात असतांना त्याला अज्ञात वाहने जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याला मार लागल्याने त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात धरणगाव-पिंप्रीच्या दरम्यान आज सकाळी झाला.

 

नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेंटिंगचे काम करणारा मजूर माजित खान अजीज खान (वय 30, रा. बिलाल चौक, तंबापूर) हा आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच 19, 1778) ने कामासाठी चोपडा येथे जात होता. पिंपरी व धरणगावच्या दरम्यान असतांना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. माजितला जखमी अवस्थेत पडल्याचे पाहून खाजगी वाहनातून नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात जखमेच्या नातेवाईकांची गर्दी जमली होती.


Protected Content

Play sound