सर्व सोयींनी परिपूर्ण असणार जिल्हयातील मतदान केंद्र

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात उभारण्यात आलेले ३८८६ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मतदान केंद्रावर परिपूर्ण सोयी करण्यात आल्या आहेत.
त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे

Protected Content