बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृध्दी महामार्गावर एका कुटुंबाला दरोडेखोरांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्हयातील मेहकर जवळ एका पेट्राल पंपावर विश्रांती घेत असलेल्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ही लूट केली आहे. या अज्ञात दरोडेखोरांनी तब्बल अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटन समृध्दी महामार्गावर मध्यरात्री तीन वाजच्या सुमारासत घडली.
समृद्धी महामार्गाने एक कुटुंब आपल्या कारने (कार क्रमांक MH 12 JC 1919) मुंबईकडे जात होतं. या प्रवासादरम्यान मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास कारचाारकाला झोप येत असल्याने त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडी लावून विश्रांती घेतली. यावेळी कारमध्ये एका महिलेसह पाच जण होते. काही वेळानंतर चार अज्ञात व्यक्ति त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कारमधील चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेले दागिने आणि पैसे मागण्यासा सुरूवात केली. जीव जाण्याच्या भीतीपोटी नाईलाजाने त्यांनी त्यांच्याजवळ असलेले दागिने आणि रोखरक्कम दोन लाख रूपये त्या दरोडेखोरांना दिले. या प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचा मुद्दा समोर आला आहे.