मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. या मतदारसंघात उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या नसीम खान यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार वर्षा गायकवाड यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रचार समितीचा राजीनामा दिला होता. काँग्रेसने राज्यात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे समाजाची नाराजीचा विचार करून मी राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता त्यांनी आपण प्रचार समितीचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. कोणताही प्रकारचा गैरसमज नको, तसेच नसीम खान पदासाठी काम करत नाही तर नसीब खान काँग्रेसच्या विचारधारेसाठी काम करतो. आम्ही गांधी, नेहरू परिवाराच्या नेतृत्वाखाली काम करतो, ही माझी कायम भूमिका राहिली आहे. त्यामुळे प्रचार समितीचा राजीनामा मी मागे घेत असल्याचे काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्पष्ट केले.
मुंबई मधून उमेदवारीसाठी आग्रही असलेले नसीम खान यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. नसीम खान यांनी आता प्रचार समितीचा राजीनामा घेतल्यामुळे वर्षा गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांची थेट लढत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उज्वल निकम यांच्याशी होत आहे. त्यामुळे आता ही लढत महत्त्वाची मानली जात आहे.