लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीत शेतकऱ्यांचा मुदृा हा प्रमुख बनला आहे. लातूर जिल्हयातील अहमदपूर येथे भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री आहेत त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रूपये देणार असल्याची घोषणा करून पैसे खात्यावर जमा होण्याची तारीख ही सांगितली आहे.
येत्या १२ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात दिली. खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पॅकेजही सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडेंनी लातूरमध्ये केली. ऐन निवडणूकीत आचारसंहिता असल्याने कुठलीही घोषणा करता येत नाही, पण मतदारांना आमिष दाखवून मत वळवण्याच प्रयत्न करण्यात येत नाही. आता मुंडे यांच्या घोषणेनंतर विरोधक काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.