Home क्राईम चामुंडामाता मुलांच्या होस्टेल येथून तीन मोबाईलची चोरी

चामुंडामाता मुलांच्या होस्टेल येथून तीन मोबाईलची चोरी

0
111

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामानंद नगर गिरणा टाकी परिसरात असलेल्या चामुंडामाता मुलांचे हॉस्टेल मधून तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १ मे रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील रामांनद नगर येथील गिरणा टाकी परिसरातील चामुंडा माता मुलांचे हॉस्टेल आहे. या ठिकाणाी बाहेरगावाचे विद्यार्थ्यी हे शिक्षणासाठी राहत असतात. दरम्यान रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता हॉस्टेलमधील सर्व विद्यार्थी झोपलेले असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रज्वल राजेश देशमुख रा. आकोला, चैतन्य गुणवंत पाटील आणि अरबाज कय्युब शेख या तीन विद्यार्थ्यांचे १७ हजार रूपये किंमतीच ३ मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना दुसऱ्या दिवशी सोमवारी २९ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १ मे रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून प्रज्वल देशमुख या विद्यार्थ्यांने फिर्याद देण्यात आली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहे.


Protected Content

Play sound