जामनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर ला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बाजूच्या बंद घराला आग लागली. घरात कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आग लागल्याची घटनाची माहिती उपसरपंच प्रकाश बोरसे यांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ सुप्रीम कंपनी गाडेगाव येथिल जेहुरकर यांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ आपली फायर टीम ला घटनास्थळी पोहचण्याचा सूचना केल्या. त्यावर सुरक्षा अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या मार्गदर्शन खाली सुरक्षा अधिकारी परमेश्वर पाटील स्वतः त्यांची फायर टीम घेऊन व पाण्याचे टँकर घेऊन आग विझविण्यासाठी मदतकार्य केले, त्यामुळे आग आटोक्यात आली. आग विझवण्यात टीम ला यश आले.त्यामुळे नेरी येथे मोठी दुर्घटना टळली. यावेळी सुप्रीम कॉन्ट्रॅक्टर कमलाकर पाटील व नेरी येथील भाजप कार्यकर्ते उपस्थीत होते. त्यामुळे सुप्रीम कंपनी व सुरक्षा फायर टीम चे नेरी ग्रामस्थाच्या वतीने कौतुक होत आहे.