जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मन्यारखेडा शिवारातील सुधाकर नगरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. संध्या निळकंठ पाटील वय ४२ रा. सुधाकर नगर, मन्यारखेडा शिवार, जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मन्यारखेडा शिवारातील सुधाकर नगरात संध्या पाटील या महिला आपले पती निळकंठ पाटील आणि मुलगा मयूर यांच्यासोबत वास्तव्याला होते. संध्या पाटील ह्या किरणादुकान चालवून ते आपला घराला हातभार लावत होत्या. सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी त्यांचे पती निळकंठ पाटील हे एमआयडीसीतील पाईप कंपनीत नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. तर मुलगा मयूर हा बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे त्या घरात एकट्या होत्या. त्यांनी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खोली गळफास घेवून आत्महत्या केली. मयुर हा घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांने आरडाओरड करत शेजारचांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.



