कंडारी शिवारातील शेतातून बोरींग करण्याचे साहित्याची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी शिवारातील शेतातून बोरींग करण्यासाठी लागणारे लोखंडी रॉड, केसींग रॉड, बोरींग मशीन असा एकुण ९७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील कंडारी येथे जगदीश गुलाब बारेला वय ३५ हा तरूणी वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. कंडारी गावातील ज्ञानदेव कोल्हे यांच्या शेतात बोरींग करण्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी जगदीश बारेला हा राहत होता. दरम्यान, २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात बोरींगसाठी लाणारे लोखंडी रॉड, केसींग रॉड, बोरींग मशीन असे साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जगदीशने बारेलाने साहित्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे हे करीत आहे.

Protected Content