Home Cities अमळनेर भरधाव दुचाकीच्या धडकेत शेतकरी जखमी

भरधाव दुचाकीच्या धडकेत शेतकरी जखमी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील सानेगुरूजी मार्केटजवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, गोपाल मंगल पाटील वय ४८ रा. कलाली ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता ते त्यांच्या दुचाकीने अमळनेर शहरातील सानेगुरूजी मार्केट येथून जात असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक (जीजे ०५ एचके १८१८) वरील अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत शेतकरी गोपाल पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर बुधवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांनी अमळनेर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जयंत सपकाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound