एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मुख्य खर्च निरीक्षक कुमार चंदन यांनी आज एरंडोल मतदार संघात जावून भेट दिली. यावेळी स्थीर सर्वेक्षण पथकाला भेट देवून प्रत्यक्ष गाडीची पाहणी केली आहे.
जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूकीच्या तयारी सुरूवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने जळगाव लोकसभा मतदार संघातील एरंडोल येथे आज मुख्य खर्च निरीक्षक कुमार चंदन यांनी पथकासह भेट देवून पाहणी केली आहे. यासोगत खर्च निरीक्षण पथक व इतर सर्व पथकांना भेटी देऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षाला भेट देवून सर्व पथकांच्या कामकाजांबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक विजयकुमार बोदाडे, प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार एरंडोल सुचिता चव्हाण, तहसीलदार पारोळा उल्हास देवरे, गटविकास अधिकारी पारोळा शिंदे, ट्रेझरी अधिकारी व्हि.डी.पाटील, नायब तहसीलदार देवेंद्र भालेराव, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.