Home Cities जळगाव केसीई इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी 

केसीई इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी 

0
45


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात शिक्षण पूर्ण केले.

परदेशातून डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर ते मायदेशी परतले. त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी आवाज उठवला. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करून यश संपादन केले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत आहे. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते, असे मत प्राचार्य सुगंधी यांनी व्यक्त केले. या वेळी अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉ.श्रीकांत तारे, पॉलिटेक्निक विभाग समन्वयक डॉ. सी. एस. पाटील, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound