Home Cities अमळनेर जुन्या भांडणावरून दोन कुटुंबात तुफाण हाणामारी

जुन्या भांडणावरून दोन कुटुंबात तुफाण हाणामारी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात जुन्या वादातून दोन कुटुंबात तूफान हाणामारी झाल्याची घटना गुरुवार ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी १२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता दोन्ही परिवारातील १५ जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात एका जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत लोखंडी रॉड आणि लाकडी काठीचा यांनी एकमेकांना मारून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवार ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता घडली होती. संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे.

पहिल्या फिर्यादीत दिपाली ज्ञानेश्वर बागुल यांच्या तक्रारीवरून रवींद्र देविदास माळी, अमोल देविदास माळी, दीपक सुरेश माळी, संदीप सुरेश माळी, सुरेश संतोष माळी, देविदास संतोष माळी सर्व राहणार दहिवद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या परिवारातील सपना दीपक माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय भिला जाधव, कल्पेश एकनाथ बागुल, कल्पेश ज्ञानेश्वर बागुल, एकनाथ बारकू बागुल, भोलेनाथ बारकू बागुल, उज्वलाबाई ज्ञानेश्वर बागुल, मंगलाबाई एकनाथ बागुल, रजूबाई भिला जाधव आणि संगीताबाई भोलेनाथ बागुल सर्व रा. दहिवद यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर करीत आहे.


Protected Content

Play sound