भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे लाईनवर अनोळखी अंदाजे ४० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे लाईनवरील रेल्वे खांबा क्रमांक ४४१ च्या ३५ जवळ एका अनोळखी अंदाजे ४० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनांसाठी धाव घेतली. दरम्यान मयताकडे ओळख पटवण्याबाबत कुठलीही वस्तू किंवा कागदत्र मिळालं नाही. पोलिसांनी मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. या घटनेबाबत भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताची ओळख पटवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहे.