जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।तालुक्यातील शिरसोली येथे बुधवारी १० एप्रिलच्या मध्यरात्री कु-हाडदे रोडवरील वैष्णोदेवी माता मंदिराचे तीन कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी दानपेटीतील एक ते दीड लाखापर्यंत रक्कम घेऊन पसार झाले आहे. गुरुवारी ११ एप्रिल रोजी सकाळी सुरक्षा रक्षक भावसिंग बारेला हा आरती करण्यासाठी आला असता हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शिरसोली प्र.न.ते कु-हाडदे रोडवरील वैष्णोदेवी माता मंदिर आहे. मध्यरात्री मंदिरांच्या मागिल दरवाजेचे कुलुप व मंदिर व दानपेटीचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी दान पेटीतील एक ते दीड लाखापर्यंत रक्कम लंपास करुन पसार झाले आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजेला सात वर्षांपासून मंदिरांची देखभाल करणारा चौकीदार भावसिंग बारेला आरती करण्यासाठी मंदिरात गेला असता यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
भावसिंग बारेला याने मंदिराचे ट्रस्टी राजु आबटकर, मधुकर आबटकर, भगवान बारी यांना कळविले. मागिल दीड ते दोन वर्षांपासून दानपेटीतील रक्कम काढलेली नव्हती. म्हणून अंदाजे यात एक ते दीड लाखापर्यंत रक्कम असु शकते असे मंदिराचे ट्रस्टी राजु आबटकर यांनी सांगितले. शेवटची वृत्त आते आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.