चाळीसगाव प्रतिनिधी । येथील शिवसेना पक्षाच्यावतीने शेतकरी पिक विमा मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी पिक विमा केंद्र निर्माण करण्याची मोहीम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हाती घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका संपर्क प्रमुख प्रकाश वाणी यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पिक विमा मदत केंद्र येथील कृषि उत्पन्न बाजार समिती जवळील शिवसेना कार्यालयात उघडले आहे. (दि. 26 जून) रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा उप-समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. मात्र अद्याप त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यांच्या माहितीसह तक्रारीचे फॉर्म भरून घेण्यात आले असून, ज्या-ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. मात्र ते विम्याच्या रक्कमेपासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांनी या मदत केंद्राचा लाभ घ्यावा व आपले फार्म भरून घ्यावेत असे आव्हान तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे.