पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्केवर धक्के देणाऱ्या भाजपाला आता शरद पवार यांच्याकडून मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे राजकीय कुटुंब मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. ही माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे. ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे भाऊ आहे.
माढा लोकसभा मतदार संघात भाजपने रणजिंतसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोहिते पाटील व त्यांचे समर्थक नाराज झाले होते. कार्यकर्त्यांनी मोहिते पाटील कुटुंबीयांकडे कोणत्याही स्थितीत लोकसभा लढवण्याचा आग्रह धरला आहे. यामुळे हे कुटुंब लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. आता विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांची गुरुवारी २८ रोजी शरद पवार यांच्यासोबत मुंबईत बैठक होणार आहे. तेथेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश होईल.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विजयसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभेचे उमेदवार म्हणून तेथेच घोषित होण्याची शक्यता आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहतील. पण मोहिते पाटील कुटुंबातील सर्वच सदस्य पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षात परत जातील, असे जयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी २७ मार्च रोजी याविषयी पत्रकारांशी बोलताना सांगितले.