भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एकाला महिला पोलीसांसमोर अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २६ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील वाल्मिक नगरात राहणारो मिथून मोहन बारसे यांचे एका सोबत भांडण झाले होते. यासंदर्भात सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता तक्रारदार हे भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आले आहे. यावेळी मिथून बारसे आणि तक्रारदार यांच्यात पोलीस ठाण्यातच वाद झाला आणि मिथून बारसे याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांसमोर अश्लिल शिवीगाळ करत पोलीस ठाण्यातील आवारातील शांतता भंग केली. याप्रकरणी अखेर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी सिमा चौधरी यांनी पोलीस ठाण्यात मिथून बारसे याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील हे करीत आहे.